Amit Thakre
Amit Thakre 
मुख्य बातम्या मोबाईल

निवडणुकीच्या तयारीसाठी अमित ठाकरेंचा नाशिकमध्ये मुक्काम!

सरकारनामा ब्युरो

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी चार दिवसांच्या (MNS leader Amit Thakre once again came in nashik after four days) अंतराने पुन्हा एकदा नाशिकमध्ये दोन दिवसांचा तळ ठोकला आहे. (He is trying to strong organisation structure of party) या कालावधीत संघटना बांधणीबरोबरच नागरी समस्यांची माहिती घेऊन निवडणुकीचा अजेंडा (He is to finalise election agenda) ठरविणार आहे. विभागप्रमुख, शाखाप्रमुखांच्या बैठकीत त्यांनी नागरी समस्या जाणून घेतल्या.

पुढील वर्षाच्या प्रारंभीच नाशिक महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून विकासकामांचे उद्‌घाटन केले जात आहे, तर शिवसेनेने शंभर प्लसचा नारा देताना सामाजिक कार्यक्रमांवर भर दिला आहे. एकेकाळी चाळीस नगरसेवकांच्या मदतीने महापालिकेत सत्ता स्थापन केलेल्या मनसेनेदेखील निवडणुकीची तयारी सुरू केली असून, त्यासाठी खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील आठवड्यात भेट देऊन कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण केला. राज ठाकरे २७ जुलैपासून पुन्हा नाशिक दौऱ्यावर येणार होते, परंतु पुणे येथे दौरा निश्‍चित झाल्याने अमित ठाकरे यांचे बुधवारी शहरात आगमन झाले.

अमित ठाकरे यांच्या राजकीय इनिंगसाठी नाशिकचे मैदान निवडले आहे. त्यामुळे निवडणुकीची सर्व धुरा अमित यांच्याच खांद्यावर राहणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अमित यांचे नाशिक दौरे वाढले आहेत. अमित यांनी बुधवारी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. पक्षाच्या राजगड कार्यालयात तब्बल अडीच तास ठाण मांडले.

मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांची माहिती करून घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय परिस्थिती, सक्रिय व निष्क्रिय पदाधिकारी, नागरिकांच्या प्रमुख समस्या, विरोधी पक्षांची ताकद, २०१७ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार व त्या प्रभागांमधील प्रतिस्पर्धी उमेदवार या संदर्भात माहिती जाणून घेतली. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, अविनाश पाटील, चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आदी या वेळी उपस्थित होते.

राज ठाकरे पुन्हा नाशिकमध्ये?
मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड व नाशिक या सर्वाधिक नागरीकरण झालेल्या ट्रॅंगलकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या आठवड्यातील दौऱ्यानंतर आता पुढील आठवड्यात राज ठाकरे पुन्हा नाशिकला येणार असून, या वेळी मनसेच्या सत्ताकाळात उभारलेला प्रकल्प व दुरवस्था याची पाहणी करणार असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT